हरियाली अमावस्येच्या पावन पर्वावर सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांनी केले वृक्षारोपण। 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- "झाडे लावा, झाडे जगवा" या मूल मंत्राला अनुसरून, सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांनी दिनांक ४ जुलै रोजी स्था. उदासी बाबा नगर, शुक्ल ले आउट येथे वृक्षारोपण केले। 



श्रावण महिन्यातील कृष्णपक्ष मध्ये येणाऱ्या या अमावस्येला अनन्य महत्त्व आहे। शास्त्रानुसार वृक्षारोपणासाठी हा महत्त्वाचा दिवस मानला जातो.अशी मान्यता आहे. यावेळी संपूर्ण भुतल हे पावसामुळे हिरवेगार झालेले असते.यामुळेच श्रावणाच्या या अमावस्येला हरियाली अमावस्या म्हणून संबोधल्या जाते। 

विशेष म्हणजे या दिवशी रविवार होता व रविपुष्य असा दुग्ध शर्करा योग घडून आला.अशा या हरियाली अमावस्या, या पावन पर्वाचे औचित्य साधून रवि जोशी यांनी कडू बादाम, कांचन, केसर आम, कडू निम,मीठा निम अशा प्रकारची पर्यावरण पूरक,झाडे लावून" झाडे लावा, पाणी व ऑक्सिजन वाढवा" असा संदेश दिला।

Post a Comment

أحدث أقدم