खामगाव शहरात इस्कॉनच्या वतीने निघाली भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा : हरे रामा- हरे कृष्णाच्या धूनवर शेकडो भाविक झाले सहभागी 

 खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पूरी धाम येथील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉनच्या वतीने खामगाव शहरात ११ जुलै रोजी सायंकाळी रथयात्रा काढण्यात आली. हरे रामा हरे कृष्णाच्या धूनवर शेकडो भाविक सहभागी झाले होते.या रथयात्रेचे प्रमुख पाहुणे म्हणून गणेशभाऊ चौकसे तर इस्कॉन अकोला अध्यक्ष वैदर्भी चरणदास, डॉ. योगेश्वर मुकुंद राहुल आंबेकर उपस्थित होते. स्थानिक जलंब नाका परिसरातून भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेला प्रारंभ करण्यात आला. फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या रथात भगवान जगन्नाथ, बलदेव आणि माता सुभद्रा यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम गणेशभाऊ चौकसे व इतर मान्यवरांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली तसेच जगन्नाथाची आरती करण्यात आली. त्यानंतर भगवान जगन्नाथाचा जयघोष करत भाविकांनी रथ ओढण्यास प्रारंभ केला. रथासमोर झाडू मारून भक्तांनी स्वागत केले. पारंपारिक वाद्याच्या गजरात ही रथयात्रा नांदुरा रोड, टावर चौक, अग्रसेन चौक ,महावीर चौक, फरशी, एकबोटे चौक, सकळकडे कॉम्प्लेक्स, सिव्हिल लाईन मार्गे परत जलंब नाका येथे रथयात्रेचा समारोप करण्यात आला. या रथयात्रेत भागवत तायडे, सुरज गोलाईत, अमित शर्मा, गौरव राठोड, गणेश निमकर्डे यांच्यासह शेकडो महिला पुरुष भाविक रथयात्रेत सहभागी झाले होते. भाविकांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले. सदर कार्यक्रम वैष्णव अविर्भाव प्रभुजी यांच्या मार्गदर्शनात पार पडला.l 

Post a Comment

أحدث أقدم