लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे लहान मुलांना कॅन्सर बाबत जागृती अभियान शिबीर संपन्न 


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- लॉयन्स क्लब खामगांव संस्कृतीच्या वतीने प्रत्येक गावात आणि प्रत्येक शाळेत कॅन्सर थांबवा, कॅन्सर पळवा जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.  दि. 13 जुलै रोजी जागृति विद्यालय, टेंभुर्णा येथे एकदिवशीय शिबीरात जवळपास 200 विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.  बालपणातील कर्करोगाची समस्या, बालपणातील कर्करोगाचा प्रतिबंध व उपचार या विषयावर सत्राचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुले, त्यांचे पालक व इतर लोकही उपस्थित होते.  असे एकदिवशीय मोफत शिबीर प्रत्येक शाळेत आयोजीत करण्यात येणार असल्याचे लॉयन्स क्लब संस्कृती खामगांव तर्फे सांगण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष लॉ.शैलेश शर्मा, सचिव तेजेंद्रसिंह चौहान, कोषाध्यक्ष लॉ.गजानन सावकार, रिजन चेअरपर्सन लॉ.सुरज अग्रवाल, झोन चेअरपर्सन लॉ.उज्वल गोयनका  यांच्यासह लॉयन्स क्लब संस्कृतीचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ.राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.  


Post a Comment

أحدث أقدم