उद्या प्रभाग क्रमांक एक मधील नवीन मतदार नाव नोंदणी अभियान 

नव मतदारांनी नावाची नोंदणी करावी- माजी नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर

घरोघरी जाऊन पोम्प्लेट वितरण करताना सौ मानकर

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क '- नवीन मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी नवीन मतदार नाव नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीच्या वतीने सुरू असून उद्या 14 जुलै रोजी जलंब नाका येथे हे अभियान राबविण्यात येत आहे. नवीन मतदारांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असे आव्हान प्रभाग एक च्या कार्यतत्पर माजी नगरसेविका भाग्यश्रीताई मानकर व विलासराव देशमुख यांनी केले आहे. प्रभागातील नवीन मतदार वंचित राहू नये यासाठी भाग्यश्री मानकर यांनी प्रभागात फिरून पोम्प्लेट वाटप केले आहे तसेच आव्हान देखील करण्यात आले आहे.


असे केले सौ.मानकर यांनी नागरिकांना आवाहन

 जागरुक नागरिकांचे सर्वप्रथम अभिनंदन ! नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. मात्र या निवडणुकीत तांत्रिक चुकीमुळे काही नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. मतदान केंद्रावर येऊनही मतदार यादीत नाव नसलेल्या त्यांना मनस्ताप झाला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दरवेळेस नवीन मतदार याद्या प्रकाशित होत असतात. त्यात आपले व परिवारातील १८ वर्षावरील सर्वांची नावे समाविष्ट असल्याबद्दल खात्री करावी लागते. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून वारंवार सूचनाही दिल्या जातात.येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानापासून वंचित राहू नये म्हणून नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच याआधी मतदारयादीतून नावाची वगळणी झाली असल्यास त्यांनाही आपली पुन्हा नोंदणी करून घ्यावी, ही नम्र विनंती !

रविवार दि. १४ जुलै २०२४, स. ११ ते सायं. ०५ पर्यंत स्थळ : जलंब नाका, खामगांव

                      आपले

       *सौ भाग्यश्री विक्रम मानकर* 

माजी नगरसेविका प्रभाग एक खामगाव

*विलासराव देशमुख*

माजी नगरसेविक प्रभाग एक खामगाव


Post a Comment

أحدث أقدم