अतिक्रमण मुळे रस्ता कामात होऊ शकतो दुजा भाव...!

अतिक्रमण काढल्यानंतरच रस्ता बनवावा- नागरिकांची मागणी 

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- स्थानिक अंबिका नगर भागातील रस्ता कॉंक्रिटी करण्याच्या कामास मंजुरात मिळाली आहे. मात्र या भागात असलेले अतिक्रमण आधी काढा व वे नंतरच रस्ता बनवावा अशी मागणी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी यांना पाठवलेल्या नियोजनातून केली आहे.

निवेदनात नमूद आहे की,वरील विषयास अनुसरून आम्ही अर्ज करतो की, आमदार निधी मधून आमचा रोड पास झालेला आहे. येणाऱ्या 4 ते 5 दिवसात रस्त्याचे काम सुरू होत आहे. परंतु रस्त्याचे काम सुरू करण्याच्या अगोदर गल्लीतील असणारे अतिक्रमण कच्चे, पक्के काढून नंतर नविन रस्ता काँक्रीटीकरण करण्यात यावे. अतिक्रमण न काढल्यास कुठे 5 फुट, 8 फुट व कुठे 10 फुट रस्ता बनणार आहे. तरी रोडचे अतिक्रमण काढण्यात यावे असेही नमूद करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم