राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या
विदर्भ सचिव पदी विनोद भोकरे यांची नियुक्ती
बुलढाणा :- पत्रकारांच्या समस्या आणि अन्याया विरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या (भारत) विदर्भ सचिव पदी विनोद भोकरे यांची नियुक्ती संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष जाधव यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी केली आहे. तसेच यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या विविध पदावर नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. 27 जुलै रोजी खामगाव येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची बैठक पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होती.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित पत्रकारांना मागदर्शन करताना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ म्हणाले की, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यात तसेच सर्व जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी विविध विषयावर कार्यशाळा, बदललेल्या कायद्यावर मार्गदर्शन शिबिर तसेच पत्रकारांचे अडी - अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्याने काम करणार असल्याची ग्वाही देत राज्यात कोणताही पत्रकार कोणत्याही संघात असला तरी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून त्या पत्रकार बांधवाला सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा मानस राहणार आहे. राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे विष्णू कंकाळ यांनी सांगितले.
बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ यांनी पत्रकारांना मागदर्शन करीत पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय देणार असल्याचे सांगितले.
यावेळी नवनियुक्त विदर्भ सचिव विनोद भोकरे यांनी नियुक्ती बद्दल सर्वांचे आभार मानत महाराष्ट्र राज्य, विदर्भासह जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करणार आहे. पत्रकारांसाठी आरोग्य, निवारा व आर्थिक परिस्थिती या गोष्टींवर भर देणार आहे. तसेच पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ ( भारत) काम करीत आहे. त्यामुळे पुढील काळात संघटना वाढीसाठी काम करीत पत्रकारांवर होणारा अन्याय व अत्याचाराला नेहमीच वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे. असे विनोद भोकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ यांनी ज्येष्ठ पत्रकार रमेश खंडारे यांची जिल्हा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच गजानन रोकडे यांची अन्याय - अत्याचार समितीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आहे.
या कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हाध्यक्ष विश्वास कंकाळ, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कान्हेरकर, नवनियुक्ती जिल्हा संघटक रमेश खंडारे, पद्माकर धुरंदर, गजानन रोकडे , जुबेर शहा, संतोष आटोळे, सिद्धेश्वर निर्मल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
إرسال تعليق