महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उद्या अकोल्यात आंदोलन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-शिवांगी बेकर्स प्रा. लि. खामगांव येथील कंपनीने चालवलेल्या मनमानी कारभार विरोधात उद्या 29 जुलै रोजी भविष्य निर्वाह निधी कार्यालय अकोला येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. (कामगारांचा EPF कायद्यानुसार कपात करण्याचे नमुद आस्थापनेला आदेशित करण्यात यावे.EPF कायद्यानुसार नमुद आस्थापना EPF कपात करीत नसेल. तर तत्काळ कादेशीर कार्यवाही करण्यात यावी.EPF ची थकबाकीची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी.ज्ञानदेव भांबेरे यांची EPF थक बाकीची रक्कम देऊन त्याना पेंशन चा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा.ज्ञानदेव भांबेरे याचा EPF कपात करण्यात आला पण शासन दरबारी जमा करण्यात आला नाही. तसेच इतर कामगारांचाEPF कमी प्रमाणात कपात करुन शासनाची व कामगारांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधी आस्थापनेच्या मालकावर कायदेशीर कठोर कार्यवाही करुन खटला दाखल करण्यात यावा. या मागण्यांसाठी उद्या एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे आनंद गायगोळ यांनी दिली.
إرسال تعليق