खामगाव पोलिसांची "थर्ड आय" लागली कामाला

औपचारिक लोकार्पणाची प्रतीक्षा !

शहरात 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे उच्च गुणवत्तेचे असल्याने दूर पर्यंतच्या परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. या माध्यमातून संपूर्ण शहरावर लक्ष ठेवता येणार आहे. हे सर्व कॅमेरे सुरू झाले असून आता केवळ लोकार्पणाची औपचारीकता बाकी आहे.

खामगाव जनोपचार ( नितेश मानकर): 'पुलीस के हात लंबे होते है, इसलीए पुलीस की हातोसे बचना मुमकीनही नहीं नामुमकीन है'हा डायलॉग आपण अनेक हिंदी चित्रपटात ऐकत आलो आहे. आता पोलिसांच्या हातासोबतच नजरही लांब झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. हे शक्य केले आहे  तिसऱ्या डोळ्याने ! आपल्यावर सीसीटीव्हीची नजर आहे किंवा आपण सीसीटीव्हीच्या कक्षेत आहात, ही सूचना बँका, खासगी दुकान, दवाखान्यात, सराफा लाईन, शासकीय कार्यालये, शहरी भागातील मॉल व चौकात किंवा हायटेक सीटीत वाचायला मिळते. त्याच प्रमाणे आता संपूर्ण खामगाव शहरावरच सीसीटीव्हीची नजर राहणार असल्याची व्यवस्था पोलिस प्रशासना कडून करण्यात आली आहे.

जाहिरात

शहरातील मुख्य रस्ते व चौकाचौकांत आधुनीक तंत्रज्ञानाने परीपूर्ण असलेले उत्कृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ध्वनीक्षेप लावण्यात आले आहे. चिडीमार भामटे, सुसाट वेगाने दुचाकी दामटणारे टपोरी, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकाविणारे भुरटे चोर, वाहने तसेच कुणाच्या हातातील बॅग व वस्तू उडविणारे चोरटे, एखादा गुन्हा करून पळ काढणारे गुन्हेगार, यांच्यासह शहरातील शांतता सुव्यवस्था बिघडविणारे समाजकंटक यांच्यावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेऊन गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. गुन्ह्याचा तपास करणे सोयीचे जाणार आहे.

जाहिरात

कॅमेरे अशा ठिकाणी लावण्यात आले आहे की जेथून पळ काढणारा चोर किंवा गुन्हेगार सहज दिसून येईल. एखादवेळी एखाद्या कॅमेऱ्यातून तो निसटून जाईल. परंतु पुढील कॅमेऱ्यात मात्र तो नक्कीच कैद होऊन त्याला पकडणे सोपे जाणार आहे. चोरीचा सारा खेळ रस्त्यावर शुकशुकाट असताना किंवा रात्रीच चालत असल्याने या चोरी प्रकरणाचा छडा लागत नव्हता. आता मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे अर्थात तिसऱ्या डोळ्याच्या मदतीने चोरट्यांवर नजर ठेवणे, शोध लावने किंवा पकडण्यास मदत मिळणार आहे.



Post a Comment

أحدث أقدم