आईसाहेब योगावर्गात योगा दिवस साजरा

खामगाव -(janopchar) आई साहेब योगा वर्गामध्ये साजरा झालेला योगा दिवस राज्यप्रभारी संजवनीताई, जिल्हा प्रभारी सुनिताताई चांडक, तहसील प्रभारी शोभाताई बाळापुरे, महामंत्री मालतीताई पोटरे व सर्व योगशिक्षीका व पदाधिकारी यांच्या सहकार्याने आईसाहेब योगावर्गात प्रोटोकॉलप्रमाणे महीला सक्षमीकरण या प्रमाणे ४० ते ५० महिलांच्या उपस्थितीत सकाळी ५.१५ ते ६.४५ या वेळेत योग वर्ग घेण्यात आला. वर्गामध्ये योगा गीत वर्षा सातव यांनी व महिलांची महती सांगणारे गीत सौ. सुशिला मसने यांनी सादर केले. योगा दिनाचे महत्व शोभाताई बाळापुरे यांनी सांगितले. सुनिल सातव, सौ. डंबेलकर, नंदा सदावर्ते, मनिषा भोपळे, वर्षा काळे, स्वाती सातव, योग शिक्षक यांनी खुप सहकार्य केले. विशेष उपस्थिती सौ. शिवलकर ताई, अनिता सातव यांची लाभली. विशेष म्हणजे आमच्या योग शिक्षीका हिवराळे ताई यांनी कोराडी येथे योग वर्ग घेतला सकाळी ७ ते ८ या वेळेत संत निरंकारी भवन मध्ये योगा दिवस घेण्यात आला. प्राणायाम, आसन, ध्यान योगाचे महत्व सांगणे, योग वर्ग चालु ठेवावा याबद्दल मार्गदर्शन करून कार्यक्रम संपविला. वरील माहिती राजकुमार गोयनका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

أحدث أقدم