कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवॉर्ड  खामगाव येथील उद्योजक विनोद डिडवानिया यांना जाहीर

उद्या अकोला येथे होणार पुरस्काराचे वितरण

खामगाव येथील घाटपुरी नाका भागातील विनोद सुपर बाजाराचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद डिडवानिया यांना नुकतेच मानाचा समजला जाणारा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे.

व्यापार आणि उद्योग जगातील १०० वर्ष जुनी आणि सर्वोच्च संस्था असलेल्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजद्वारे व्यापार व उद्योग जगातील प्रतिष्ठेचा व सर्वोत्कृष्ट समजला जाणाऱ्या कॉरपोरेट सोशल रिस्पोंसीबिलिटी अवार्ड २०२४ (CSR AWARD २०२४) साठी खामगाव येथील उद्योजक विनोद डिडवानिया यांची निवड करण्यात आली आहे. रविवार २३ जून रोजी खंडेलवाल भवन अकोला येथे आयोजित कार्यक्रमात डिडवानिया यांना मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने डिडवानिया यांचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

أحدث أقدم