खामगाव:-  सजनपुरी ते बर्डे प्लॉट जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या एका विहिरीत गोवंशाचे काही अंश  व मासाचे तुकडे आढळून आल्याने खामगावात खळबळ उडाली. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे सदर घटना उघडकीस आली. ही वीहीर अनेक दिवसांपासून पडीत असून या विहिरीत सुरुवातीला विशिष्ट समाजाकडून केरकचरा टाकला गेला मात्र आज गोवंशाचे अंश या ठिकाणी दिसून आल्याने खळबळ उडाली. 


याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या विहिरीत मिळून आलेले अंश पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान असे कृत्य करणाऱ्या वर कठोर कार्य करावी अशी मागणी युवा हिंदू प्रतिष्ठान चे संस्थापक रोहित पगारिया यांनी यावेळी रेटून धरली. दरम्यान नगर परिषदेच्या ट्रॅक्टर द्वारे घटनास्थळी आढळलेल्या मास व व मुंडके हलविण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जाधव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले . वृत्तलेपर्यंत कारवाई सुरू होती

Post a Comment

أحدث أقدم