योगदिनी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज च्या नवीन  सत्रास प्रारंभ


      खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-       आज दिनांक २१ जून २०२४ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज आवार ता. खामगांव येथे जागतिक योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. प्राश्री.रामकृष्ण द.गुंजकर सर तसेच सचिवा प्रा.सौ.सुरेखाताई रामकृष्ण गुंजकर मॅडम  यांच्या हस्ते दीप प्रजवलन करून तसेच राष्ट्रगीताने योग कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य श्री.सतिशजी रायबोले सर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. देविदास जाधव आणि उपमुख्यध्यापक श्री.संतोष अल्हाट , योग गुरु किरणजी रेठेकर साहेब, सौ.कविता किरण रेठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ.कविता किरण रेठेकर  यांनी विद्यार्थ्यांना आजच्या दिनाचे महत्व आणि मानवाच्या दैनंदिन जीवनात योगाचे महत्व पटवून दिले. तसेच किरणजी रेटेकर यांनी मुलांना योगाचे वेगवेगळे दाखले देऊन योगाचे महत्व समजून सांगितले तसेच आयुष्यात ताण तणाव मुक्त करायचा असेल तर योगाशिवाय पर्याय नाही असे किरणजी रेडेकर साहेबांनी प्राणायाम करताना विविध विषयावर मार्गदर्शन केले

            तसेच आज जागतिक योग दिवस याच दिवशी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचे नवीन शैक्षणिक सत्र सुरु करण्या मागचा उद्देश संस्थेचे अध्यक्ष श्री.रामकृष्ण गुंजकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. यावेळी  किरणजी रेठेकर यांनी अतिशय सुंदर योग प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी गुंजकर कॉलेज चे प्रा.भराड सर ,प्रा. विरघट सर,प्रा.जवंजाळ सर ,प्रा.भाटीया प्राजाधव मॅडम प्रा  तिवारी मॅडम,प्रा. भुईभार सर,प्रा.इरफान कुणाल युवराळे सर सर,शाळेचे ,घोडके सर, ब्राह्मणे सर जुमळे सर, बंड सर,मोरे मॅडम,ठाकरे मॅडम , शेलकर वाघमारे मॅडम भोपळे मॅडम देवचे मॅडम अवथळे मॅडम,भावना देशमुख मॅडम, कबाडे मॅडम ,सोनोने मॅडम , मारके मॅडम,जैन मॅडम अविनाश ठाकरे सर नवनीत फुंडकर सर धनंजय वांडे विजय तायडे संजय इंगळे शिवशंकर ठाकरे बोचरे मावशी आणि मंदा तायडे आणि शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे पालकांची सुद्धा भरभरून उपस्थिती होती शाळेचा नवीन शैक्षणिक क्षेत्राचा पहिला दिवस असल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते मुलांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती



Post a Comment

أحدث أقدم