आरपीएफ रंजन तेलंग यांची पुन्हा दमदार कामगिरी
दोन मोबाईल चोरटे रंगेहाथ ताब्यात
शेगाव (जनोपचार न्यूज नेटवर्क)दिनांक 18 जून रोजी कायम च आपल्या दमदार कामगिरी ने चर्चेत असलेले रंजन तेलंग यांना सूचना भेटली की दोन संशयित व्यक्ती रेल्वे स्टेशन शेगाव च्या पार्किंग परिसरात आहेत रंजन तेलंग लगेच तिथे पोहचताच दोघांनी ही एका झोपलेल्या यात्री चा मोबाईल काढून पसार होण्या आधी रंजन तेलंग यांनी दोघांना पकडले व त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कडे मोबाईल मिळून आला तेलंग यांनी यात्री ला उठवून विचारपूस करता त्यांनी आपला मोबाईल व पर्स चोरी गेल्याचे सांगितले त्यावरून रंजन तेलंग यांनी फिर्यादी व आरोपी ना उपनिरीक्षक डॉ विजय साळवे यांच्या कडे नेले त्यांनी चौकशी करून कायदेशीर कारवाई करून जीआरपी शेगाव येथे ताब्यात दिले वरून त्यांच्यावर 164/2024कलम 379,34 A नुसार अटक करण्यात आली असून या दोघांपैकी एकावर यापूर्वी ही गुन्हे दाखल असून तो सराईत अट्टल चोरटा असल्याचे दिसून आले उपरोक्त कारवाई मंडळ सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली रंजन तेलंग यांनी ही कामगिरी केली
إرسال تعليق