मतदारांच्या भेटी घेताना महिला शिवसेना तालुका अध्यक्ष सौ श्रुती ताई पतंगे व इतर
प्राध्यापक खेडेकर यांच्या प्रचारासाठी महिलाही सरसावल्या
खामगाव:- येत्या काही दिवसावरच बुलढाणा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने सर्व पक्षांनी आपापल्या प्रचाराचे कार्य जोमाने सुरू केले आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचाराचेही कार्य सुरू झाले आहे. खामगाव येथील शिवसेनेच्या महिला तालुकाप्रमुख सौ श्रुतीताई पतंगे, बबीता ताई हट्टेल,शैलेजाताई ठाकरे, डॉक्टर तबसूम हुसेन, नंदाताई दुबे आदींच्या नेतृत्वाखाली महिलांनी देखील खामगावात प्रचार कार्य गल्ली गल्लीत सुरू केले आहे. त्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते
إرسال تعليق