खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या खामगावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची महासभा
महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
खामगाव - बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भुमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवार दि.23 एप्रिल रोजी खामगाव येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी - रिपाई (आठवले) - रासप महायुतीकडून सलग चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव बुलडाणा लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवत आहेत. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी दिवसरात्र झटत असून प्रचाराचा झंझावात सुरू आहे. तर मतदारांकडून खा.जाधव यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि.23 एप्रिल रोजी खामगाव येथील जे.व्ही.मेहता विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, महेकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर, खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर, बुलडाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड, चिखली मतदार संघाच्या आमदार सौ.श्वेताताई महाले, आमदार वसंतराव खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार सुखदेव नंदाजी काळे, माजी आमदार सर्वश्री भारतभाऊ बोंद्रेख चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे, धृपतराव सावळे, शशीकांत खेडेकर आदी नेते उपस्थित राहणार आहेत. या महासभेला बुलडाणा लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पिरिपा, रयत क्रांती संघटना, रासप, प्रहार तसेच महायुतीतील मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मतदार बंधुंनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे.
إرسال تعليق