लोकसभा उमेदवार संदीप शेळके यांनी केला आचारसंहितेचा भंग!
संदीप शेळके यांनी आणले आणखी सहा लोकांना गोत्यात!
![]() |
संदीप शेळके यांच्या स्टंटबाजीचा हाच तो फोटो |
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या जबाबदार(?) व्यक्तीकडून आचारसंहितेची पायमल्ली होत असेल तर कारभार कसा सांभाळणार असा प्रश्न आता जनता व्यक्त करीत आहे. कारण लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या खुद्द उमेदवाराने असा पराक्रम केला आहे. हा पराक्रम करणाऱ्या उमेदवाराचे नाव संदीप शेळके असे असून शेळके मुळे आणखी सहा लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 एप्रिल रोजी संदीप शेळके यांना आचारसंहीता कक्षेने पदयात्रेकरीता परवानगी दिलेली असतांना त्यांनी पदयात्रे, बरोबरच टावर चौक येथे विनापरवानगी ने कार्नर सभा घेतली. तसेच सभेमध्ये विनापरवानगीने दोन JCB वाहनाचा वापर केला आणि टावर चौकात खामगाव शहरातील वाहतुकिस अडथळा निर्माण करुन लोकसभा निवडणुक आदर्श आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे खामगाव शहर पोलिसांनी संदीप शेळके आरोपी विजयसिंग विनायकराव इंगळे, रा चांदमारी खामगाव, डॉ. आकाश वासुदेव इंगळे , ओम गजानन ठमके , निलेश त्रंबक काळणे व नरेश चंद्रकांत गवई यांच्याविरुद्ध कलम 171 H,188 भादवी सहकलम 37 (1) (3) मपोका नुसार गुन्हा दाखल केला आहे.
إرسال تعليق