रिपाई(आंबेडकर)पक्षाचे भाई संतोष इंगळे यांची ग्रामीण भागात पकड!
खामगाव:- लोकसभेची निवडणूक येत्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे पक्ष अपक्ष अशी लढत समोर आली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचे भाई संतोष इंगळे यांची देखील उमेदवारी आता प्रचाराच्या माध्यमातून समोर आले आहे. ग्रामीण भागात तील नागरिक त्यांना पसंती दर्शवीत असल्याचे चित्र पहावयास मिळते. ऑटो या निशाणीवर भाई संतोष इंगळे लढत आहेत त्यांनी म्हटले आहे की,भारतिय संविधान निर्माता व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया चे संस्थापक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता स्वतंत्र्यता बंधुत्व व न्याया वर आधारित रिपब्लिकन विचारधारा आपल्याला दिली, रिपब्लिकन विचारधारेवर आपल्या देशाची एकता व अखंडता अबादीत राहीली. जाती व धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या राजकिय पक्षापासुन मुक्ती मिळवण्यासाठी व भारतीय संविधान व लोकतंत्र वाचविण्या साठी आपन आर.पी.आय (ए) उमेदवारास मतदान करावे हि नम्र विनंती..
إرسال تعليق