शबे बारात च्या पवित्र दिनानिमित्त ताज नगर येथे भव्य रोग निदान शिबीर संपन्न : अनेक रुग्णांनी घेतला लाभ
सेवाभावी डॉ. नितीश अग्रवाल यांनी केली रुग्णांची तपासणी
खामगाव (का. प्र.) : खामगाव ताज नगर येथे शबे बारात च्या पवित्र दिनानिमित्त खामगाव ग्रामीणचे उपसरपंच नदीम सलीम शेख यांच्या नेतृत्वात भव्य मोफत रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सरपंच सौ. हर्षा अजय दाते यांच्या हस्ते झाले. या शिबीरामध्ये शहरातील सुप्रसिध्द अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीशजी अग्रवाल, बालरोग तज्ञ डॉ. अमजद सलीम, स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलोफर शेख, डॉ. फैजान शेख, डॉ. वकार मोहसीन व डॉ. नाझीया शेख या डॉक्टरांनी शिबीराला आलेल्या अनेक रुग्णांच्या विविध रोगांची तपासणी करुन मोफत उपचार केले.
यावेळी रक्त लघवी यांची तपासणी सुध्दा या शिबीरामध्ये मोठया प्रमाणावर करण्यात आली. या शिबीराच्या माध्यमातून ताज नगरसहीत खामगाव ग्रामीण परिसरातील असंख्य रुग्णांनी लाभ घेतला असून प्रथमच एवढया मोठया प्रमाणावर अशा भव्य स्वरुपाच्या रोग निदान शिबीराचे आयोजन उपसरपंच नदीम शेख तसेच त्यांचे सहकारी यांनी केले. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून त्यांनी आयोजित केलेल्या या शिबीरा मध्ये एकुण 158 रुग्णांना लाभ मिळाला असून रुग्णांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले. तर आपला अतिशय मोलाचा वेळात वेळ काढून सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याकरीता उपस्थित राहलेल्या नामांकित डॉक्टरांचा आयोजक उपसरपंच नदीम शेख तसेच त्यांचे सर्व सहकारी आयोजक यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केले.
إرسال تعليق