बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला मिळाले यश !

खामगाव – जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाचा देणार 50%

खामगाव:- (जनोपचार न्यूज नेटवर्क )शासनाच्या महसुलात भर पाडून नागरिकांच्या सोयीसाठी प्रात्यक्षिक असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभाग करण्यास मान्यता दिली आहे .तशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री ना अजित पवार यांनी केली आहे.

आमदार आकाश दादा फुंडकर व बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.टक्के आर्थिक सहभाग करण्यास राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. खामगाव जालना १६५ किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी ५५०० करोड रुपये अंदाजे खर्च येणार आहे. 

खा. प्रतापराव जाधव ,आमदार संजय कुटे, आमदार, स़ंजय रायमुलकर व आमदार आकाश फुंडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना राज्य शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभाग बाबतीत पत्र दिले होते. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी विधानसभेत ना. अजित पवार यांनी  खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात ५० खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी दिल्लीत मागिल १५ वर्षांपासून पाठपुरावा केला आहे तर राज्य शासन स्तरावर बुलढाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पाठपुरावा केला, त्यामुळे आज खामगाव – जालना रेल्वे मार्गासाठी अंतरिम अर्थसंकल्पात ५० टक्के आर्थिक सहभाग करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.



Post a Comment

أحدث أقدم