म्हाताऱ्याने केले अशोभनीय कृत्य ...!
१८ वर्षीय विद्यार्थिनीचा केला विनयभंग
खामगाव:- येथील बसस्थानकासमोरुन कॉलेजला जात असलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तवणूक करत तिचा विनयभंग करणाऱ्या 65 वर्षीय वृद्धला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. आज सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सदर इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय विद्यार्थिनी शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते. या करीता ती सध्या खामगाव येथेच राहत असून नेहमीप्रमाणे आज ती येथील बसस्थानकासमोरुन रोडने कॉलेजला जात होती. यावेळी एक ६० ते ६५ वर्षीय इसम एकदम तिच्या समोर आला व त्याने सदर विद्यार्थिनीच्या शरीराला वाईट उद्देशाने स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. यामुळे ती एकदम घाबरुन ओरडली. दरम्यान परिसरातील नागरिकांनी धाव घेवून या इसमास पकडले व पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र चौकशी दरम्यान तो पोलिसांना चुकीचे नाव सांगून नाटक करीत होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी म्हणून त्याच्याविरुध्द कलम ३५४,३५४(अ) भादंवीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.
إرسال تعليق