सबळ पुराव्या अभावी खुन प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता
आरोपीच्या वतीने एड. संजयकुमार बडगुजर व एड. अंकुश डंबेलकर यांनी केला जबरदस्त युक्तिवाद
खामगाव :-शेगाव येथील एका लॉज च्या रूममध्ये आढळून आलेल्या मुलीच्या मृतदेहाप्रकरणात न्यायालयाने सबळ पुरावावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली याबाबत विधी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव पोलीस स्टेशन शेगांव शहर येथे दि.२८/०३/२०१० रोजी फिर्यादी यांनी फिर्याद दिली होती की, हॉटेल महाराजा रेसिडेन्सी शेगांव येथे रुम नं.२०६ येथे एका मुलीचा खुन झालेला आहे. सदर फिर्यादवरुन पोलीसांनी तपासादरम्यान आरोपी अंकुश सुरेश बन (गोसावी) याला आरोपी म्हणुन समाविष्ट करुन अटक केली होती. सदर प्रकरणाचा तपास करुन पोलीसांनी वि.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय खामगांव येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर वि.न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकुण साक्षिदार तपासण्यात आले होते. त्यानंतर आरोपीच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद वि.न्यायालयात केला होता. त्यानंतर सदर प्रकरणात वि.न्यायालयाने आरोपी विरुध्द खुनाचा दोष सिध्द न झाल्यामुळे आरोपी अंकुश गोसावी याला सदर प्रकरणातुन दि. २६/०२/२०२४ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी अंकुश गोसावी यांच्यातर्फे वि.न्यायालयामध्ये एड. संजयकुमार बडगुजर व एड. अंकुश डंबेलकर यांनी काम पाहिले.
![]() |
एड. संजयकुमार बडगुजर |
إرسال تعليق