हरिओम मंडळाने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली

खामगाव शहरातील भटकी कुत्रे (श्वान) गौरक्षणातील गायांना चारा वाटप व शासकीय सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णानां भोजन वाटप स्थानिक जगदंबा रोड भागातील हरिओम जगदंबा उत्सव मंडळाने सर्वप्रथम जगदंबा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी २ ते ४ दरम्यान खामगाव शहरातील भटकी कुत्रे ( श्वान) यांना पाव/तोस/बिस्किट, दूध देण्यात आले. 


त्यानंतर रेल्वे गेट हनुमान मंदिर येथील गौरक्षण मधील गायांना (गो-माता) सरकी ढेप, कडबा कुट्टी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शासकीय सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णानां / रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले. नंतर भुसावल चौकामध्ये शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मालार्पण करण्यात आले. 



यावेळी मंडळाचे अध्यक्ष रवी भोसले, मंडळाचे सचिव गणेश लामधाडे, योगेश वानखेडे, राजेश सुलताने, आनंद गुळवे, रुपेश गांधी, मोहन माकोडे, अमोल शिरसाट, योगेश सुरेका, सार्थक लामधाडे, ऋतिक चिखलकर, मयूर देवगिरीकर, श्रीकांत भोसले, आकाश चिखलकर, योगेश गांधी यांच्यासह हा कार्यक्रम अभिनव उपक्रम यशस्वी करण्याकरिता कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

أحدث أقدم