भाजपा वैद्यकीय आघाडी खामगाव विधानसभा मतदार संघाच्या संयोजकपदी होमिओपॅथी तज्ञ डॉ. महेश आखरे
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क- महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी खामगाव विधानसभा मतदार संघाच्या संयोजकपदी श्री राम कृष्ण होमिओपॅथी क्लिनिकचे संचालक डॉ. महेश आखरे (एम. डी. होमिओपॅथ.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. आखरे यांच्या कडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे यांच्या संमतीने एका पत्रकाद्वारे ही नियुक्ती करण्यात आली आहे.
إرسال تعليق