संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत”चे यशस्वी आयोजन

जनुना तलाव येथे राबविण्यात आले 'स्वच्छ जल-स्वच्छ मन अभियान 

जल परमात्म्याचे वरदान आहे आपण त्याचे अमृताप्रमाणे रक्षण करायचे आहे- सद्गगुरू माता सुदीक्षाजी महाराज

खामगांव(प्रतिनिधी):25 फेब्रुवारी, 2024:- सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली सकाळी 8.00 वाजता ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रुपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली. 

       याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा परिक्षेत्रामध्ये खामगांव तहसील येथील जनुना तलाव येथे जल स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये या अभियानाला *हसानंदजी छतवाणी सेवादल संचालक तसेच मु़खी अजयजी छतवाणी खामगांव ब्रँच*  ह्यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सदर अभियानाला प्रामुख्याने मुखी अजयजी, नांदुरा कृषी अधिकारी, जैन समाजाचे भाटीयाजी,तसेच संत निरंकारी मंडळाचे सेवादल महात्मा, बहेनजी तसेच साथसंगत मिळुन ८० च्या आसपास उपस्थिती होती. 

  संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने  बाबा हरदेवसिंहजी यांच्या विपुल शिकवणूकीतून प्रेरणा घेत या “प्रोजेक्ट अमृत”चे आयोजन करण्यात आले. यावर्षी ‘आओ संवारे, यमुना किनारे’ (चला सावरू यमुनेचे तीर) या मुलभूत संदेशातून या परियोजनेने एक जनजागृतीचे रूप धारण केले. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे समस्त अधिकारीगण मान्यवर अतिथि तसेच हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक व सेवादलचे सदस्य सहभागी झाले.  कार्यक्रमाचे थेट प्रसारण संत निरंकारी मिशनच्या वेबसाईटवर करण्यात आले ज्याचा लाभ देश-विदेशातील भाविक भक्तगणांनी घेतला. या कार्यक्रमात दिल्ली विश्वविद्यालयातील हजारो विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी व पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक मान्यवर अतिथींनी भाग घेतला. एफ एम रेडिओ चॅनल 92.7-बिग तसेच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे प्रतिनिधिही या कार्यक्रमात सहभागी झाले. संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण प्रभारी श्री.जोगिन्दर सुखीजा यांनी विस्तृत माहिती प्रस्तुत करताना सांगितले, की ‘प्रोजेक्ट अमृत’ दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक नियमांचे उचित पालन करण्यात आले. कार्यक्रमात सहभागी सर्व सेवादार व आगंतुकांच्या बसण्याची, चहापानाची, पार्किंगची, ॲम्ब्युलन्स व वैद्यकीय सुविधा इत्यादिंची उचित व्यवस्था करण्यात आली होती. या परियोजनेमध्ये जास्तीत जास्त युवावर्गाचे सक्रिय योगदान राहिले. श्री.सुखिजाजी यांनी सूचित केले, की ही मोहिम केवळ एक दिवसांची न राहता यापुढे दरमहा वेगवेगळे घाट व जलस्रोतांची स्वच्छता निरंतर होत राहील. 

    ‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितिय टप्प्याचा प्रारंभ करताना निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा निष्काम भावनेनेच व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसेची इच्छा नसावी. सेवा करताना आपण तिच्या प्रदर्शनाचा गाजावाजा न करता सेवेच्या मूळ भावनेवर केंद्रीय राहायला हवे. स्वत:चे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे आपले लक्ष द्यायला हवे. कारण त्यातूनच समाज आणि जगामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते. स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा उगम होतो. सद्गुरु माताजींनी “प्रोजेक्ट अमृत” या प्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आमचे कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणातून व्याप्त परमात्म्याश्याी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचनेवरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा. 

  कार्यक्रमाचे समापन झाल्यानंतर सहभागी झालेल्या अतिथीगणांनी मिशनची अत्यधिक प्रशंसा केली आणि निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी यांचे हृदयापासून आभार व्यक्त करुन सांगितले, की या कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून मिशनने जल संरक्षण व जल स्वच्छतेच्या दिशेने, प्रकृती रक्षणार्थ निश्चितपणे एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Post a Comment

أحدث أقدم