श्री संत गजानन महाराज प्रकट दिना निमित्य अन्नकुटी येथे महाप्रसादाचे आयोजन



खामगाव :- सर्व भाविक-भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, श्री संत गजानन महाराज प्रकट दिना निमित्य खामगांव-शेगांव रोडवरील,लासुरा जवळ असलेल्या गुरुवर्य श्री वसंत महाराज अन्नकूटी येथे शुक्रवार 1 मार्च 2024 व शनिवार दि. २ मार्च 2024 ला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे,तरी सर्व भाविक-भक्तांनी "महाप्रसादाचा "लाभ घ्यावा असे आवाहन अन्नकुटी परिवार खामगांव व  अजय कटयारमल परिवार नागपूर यांनी केले आहे.       गुरुवर्य श्री वसंत महाराज अन्नकूटी  गेल्या नऊ वर्षापासून भाविक-भक्तीच्या सेवेत कार्यरत आहे. "श्री"च्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना या ठिकाणी चहा-पाणी, जेवण, निवास या सारख्या सेवा निःशुल्क पुरविण्यात येतात . तसेच दर गुरुवार व दर एकादशीला  चहा-फराळाचे वाटप  करण्यात येते. तसेच या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या संस्कृतीचे जतन करण्यात येते, अशा प्रकारे धार्मिक व सामाजिक कार्यात अन्नकूटी परिवाराचा मोठा सहभाग असतो. अन्नकूटी या ठिकाणी आपल्याला विशेष एक गोष्ट निदर्शनास येते ते म्हणजे या ठिकाणी कोणीही देणगी मागण्यासाठी पावती पुस्तक घेऊन बसलेला दिसत नाही एवढेच काय तर या ठिकाणी कोठेही दानपेटी सुद्धा आपल्याला दिसत नाही. असे असूनही या ठिकाणी सर्व सुविधा निःशुल्क पुरविल्या जातात,आज पर्यंत लाखो भाविक भक्तांनी येथील सुविधांचा लाभ घेतला आहे. "श्री"च्या भक्तांसाठी "अन्नकुटी" हा कायम सुखद असा "विसावा" केंद्र ठरत आहे.

Post a Comment

أحدث أقدم