'अभाविप तर्फे संडे फोर स्टॅच्यु अभियान
खामगांव -(जनोपचार न्यूज नेटवर्क) स्थानिक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे संपूर्ण देशात स्टुडंट्स फाॅर डेव्हलपमेंट (एस एफ डी) अंतर्गत संडे फॉर स्टॅच्यु व क्लिन अप ड्राईव च्या अनुषंगाने अभाविप खामगांव शाखेच्या वतीने टॉवर चौकातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची व परिसराची स्वच्छता करण्यात आली.
अभाविप चे जिल्हा प्रमुख गणेश घोराळे व जिल्हा संयोजक तथा रा.से.यो.चे विद्यापीठातील सल्लागार ऋषिकेश वाघमारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.म
या प्रसंगी महेश वाघमारे यांनी एस एफ डी अंतर्गत संडे फॉर स्टॅच्यु व क्लिन अप ड्राईव च्या अंतर्गत दर रविवारी शहरातील एक एक पुतळ्याची स्वच्छता करण्यात येईल त्या मुळे युवकांमध्ये स्वच्छता व महापुरुषांप्रती आदर निर्माण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी गणेश कठाळे, प्रेम करवते, प्रथमेश कोहळे, आनंद निकाळजे ,रितेश ढगे, आकाश असवार, शुभम राठोड, दीपक राऊत, ओम बजर, कृष्णा चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق