उद्या श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन
सोनार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
खामगाव - सोनार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्या मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी सुवर्णकार नवयुक बहुउद्देशीय मंडळ व सोनार समाजाचे वतिने पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील रेखा प्लॉट सती फैल भागातील सोनार समाज सभागृह स्थित संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता सर्वप्रथम नरहरी महाराज यांच्या मूर्तीला जलाभिषेक करून महापूजा करण्यात येईल. 10 वाजता पालखी मिरवणूक, 11.30 वाजता ह. भ. प. मुरलीधर महाराज हेलगे यांचे गोपाळ काल्याचे किर्तन होणार असून यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. दरम्यान कार्यक्रमात सोनार समाजाचे प्रश्न, समस्या, सामाजीक उपक्रम, भविष्य काळात राबवायचे योजना आदी विषयावर चर्चा करून समाजासाठी आणखी कसे काम करता येईल यावर चर्चा करून विचार मंथन केले जाणार आहे. या कार्यक्रमात सर्व सोनार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णकार नवयुवक बहुउद्देशीय मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
![]() |
Advt. |
إرسال تعليق