श्री. संताजी इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे

मंगेश श्रीधर वानखडे अकोला महानगराचे नवे अध्यक्ष



अकोला (जनोपचार न्यूज नेटवर्क )विद्या भारतीच्या अकोला शहरात पाच शाळा संलग्न असून या शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व पाच आधारभूत विषयांच्या आधारावर विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले जाते त्याच प्रमाणे मनुताई कन्या शाळा परिसरात सरस्वती शिशु वाटिका मागच्या वर्षी सुरु करण्यात आली असून या मध्ये विद्याथ्यींना विना पाटी पुस्तक, पंचकोशांच्या विकासासाठी क्रियकलाप आधारित मातृभाषेतून शिक्षण दिल्या जाते आहे. अश्या प्रकारच्या शिक्षणामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनियुक्त अकोला महानगर अध्यक्ष श्री. मंगेश श्रीधरराव वानखडे हे जनसखा शिक्षण युवक कल्याण, समाज चे कल्याण, व्यायाम क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून का त्याच्या अंतर्गत श्री. संताजी इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय भिरडवाडी, बाळापूर नाका, जुने शहर, अकोला व तसेच त्यांच्या द्वारे स्व. विनयकुमार पाराशर मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, गुरुदत्त नगर डाबकी रोड, अकोला या शाळांचे संचालन केल्या जाते. उपस्थित सवींनी मंगेश वानखडे यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. नवनियुक्त महानगर अध्यक्ष यांनी अकोला महानगरात अधिक जोमाने कार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी विद्या भारतीचे जिल्हा उपाध्यक्षा माधवी कुलकर्णी, जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. विक्रम जोशी, जिल्हा प्रमुख शरद वाघ, महानगर प्रमुख योगेश मलेकर, ताराताई हातवळणे, रेखाताई खंडेलवाल, श्रीदेवी साबळे, डॉ. सुबोध लहाने, मृणाल कुलकर्णी, शुभांगी जोशी, लता कुन्हेकर, नेहा खंडेलवाल, पलूवी कुलकर्णी यांच्यासह विद्या भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم