मुंबईच्या धर्तीवर सामान्य रुग्णालय विकसित व अत्याधुनिक करणार- आ. अँड. फुंडकर
*रुग्णालय परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन*
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- मुंबईसारख्या मोठ्या शहराप्रमाणे खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालय विकसित तसेच सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक करणार असे प्रतिपादन आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आज सुमारे 72 लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. खामगाव सामान्य रुग्णालयात लहान मुले महिलांसाठी दोन अत्याधुनिक वार्ड मुंबईतील रुग्णालयाप्रमाणे आ अँड आकाश फुंडकर यांचे प्रयत्नातून उभारण्यात आले आहेत. या दोन्ही इमारतींना जोडणारे रस्ते नाल्या व इतर कामांचे भूमिपूजन आज आ अँड आकाश फुंडकर यांचे शुभहस्ते करण्यात आले. खामगाव जिल्हा उपसामान्य रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सुविधा गोरगरीब रुग्णांसाठी गेल्या दहा वर्षात पाठपुरावा करून आणलेले आहेत .खामगाव उपजिल्हा रुग्णालय यांची बेड क्षमता वाढवावी यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे, तसेच आणखीही अद्यावत व अत्याधुनिक चांगल्या आणखी रुग्णांच्या सेवेसाठी सुविधा लवकरच उपलब्ध होतील असे आश्वासन यावेळी आ अँड आकाश फुंडकर यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे, भाजपा जिल्हा महामंत्री शरदचंद्रजी गायकी ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य राम मिश्रा, खामगाव विधानसभा प्रमुख तसेच ऋण कल्याण समिती सदस्य संजय शिनगारे, सतीशआप्पाजी दुडे, सुरेश घाडगे, यश आमले भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ शिवानीताई कुलकर्णी , सौ मनीषा माटे , सौ श्रद्धा धोरण, सौ भक्ती वाणी, सौ पूजाताई वराडे, अनिस जमादार ,वैभव डवरे, पिंटूभाऊ टाले, डॉ. महेश आखरे राजेश शर्मा, मुळीक, , नंदू कांडेकर, उल्हासराव वानखडे, डॉ. चरखे, विजय उगले ,रमेश इंगळे, प्रसाद यदलाबादकर, रोहन जयस्वाल, ,शशी गिरी ,संदीप राजपूत, हितेश पद्मगिरीवार, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق