स्व. सौ. मीनाताई जाधव औ. प्रशिक्षण संस्थे मध्ये विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- आज दि 22 फेब्रुवारी कामगारांचे दैवत विश्वकर्मा यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरवातीला दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी लक्ष्मिनारायन ग्रुपच्या संचालिका सौ. राजकुमारी तेजेन्द्रसिह चौहाण यांच्या समवेत स्व. सौ. मीनाताई जाधव औ. प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राहुल अग्रवाल उपस्तीत होते. यावेळी बोलताना आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आपले प्रशिक्षण उत्तम रित्या करून सक्षम पणे प्रयत्नशील राहावे. व आपले कौशल्य सिद्ध करावे जेणेकरून आपले आयुष्य आपण स्वतःचे जीवन सुखकर करू शकतील यासाठी नियमितता अंगिकारणे उपयुक्त आहे .यावेळी सामोयोचीत मार्गदर्शन स्व. सौ. मीनाताई जाधव औ. प्रशिक्षण संस्थेचे विभागप्रमुख आकाश खंडेराव यांनी केले.तसेच कार्यक्रमचे संचालन निदेशक अजय घाटे यांनी केले .व आभारप्रदर्शन विकास पल्हाडे यांनी केले. कार्यक्रमाला यावेळी फार्मसी विभागाचे प्राचार्य विशाल पडघान, शिवप्रसाद चौहाण विज्ञान विभागाचे धनश्री चंदन ,दीपिका जोशी ,हर्षा भाडे, वैशाली ममतकार, सावळे मॅडम, अत्तरकर मॅडम, सौ वंदना जाधव,स्वप्नील शिंदे यांच्यासह बहुसंखेने विद्यार्थी उपस्तीत होते .
إرسال تعليق