सहकार महर्षीं स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगाव
"वैखरी" राज्य साहित्य पुरस्कार 2023
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क:- 2023 पासून प्रथमच 'वैखरी राज्य साहित्य पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले असून ते काव्य, कादंबरी आणि संकीर्ण ह्या साहित्य प्रकारांना देण्याचे ठरले. साहित्य चळवळीला चालना मिळून नवोदितांमध्ये लेखनाच्या प्रेरणा निर्माण व्हाव्यात, त्या वृध्दिगत व्हाव्यात आणि त्यांच्यामध्ये कृतार्थलेची भावना निर्मिती व्हावी त्यासोबतच आपल्याकडून साहित्यीकांचे, समाजाचे ऋण अल्पांशाने का होईना फेडले जावे, ह्या उदात्त हेतूने सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाने हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केलेला आहे. या पुरस्काराचे सोबतच एखाद्या साहित्यिकाची संपूर्ण साहित्यसेवा लक्षात घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करावे, हे सुध्दा निश्चिती करण्यात आले. रोख रक्कम 11 हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती आज खामगाव येथील शिंगणे महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी डॉक्टर सद्गुगुण राव देशमुख, प्राचार्य डॉ संजय पाटील, डॉ नीलिमा देशमुख , डॉ हर्षा ढाले, डॉ प्रमोद चौहान सर आदींची उपस्थिती होती.
जीवन गौरव पुरस्कारःडॉ सदानंद देशमुख, बुलडाणा यांना त्यांच्या साहित्य सेवेसाठी 'जीवनगौरव पुरस्काराने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना बारोमास कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांच्या बारोमास, तहान, चारीमेरा ह्या कादंबऱ्या खुंदळघास, गाभुळगाभा, रगडा, लचांड आदी कथा संग्रह प्रसिध्द आहेत. गावकळा, बळ घेऊन भूईचे या कविता संग्रहासोबतच व-हाडी भाषेचे महाराष्ट्रामध्ये नामवंत साहित्यिक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.ना. आपटे पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. हिंदी व मराठी मध्ये त्यांच्या बारोमास या कादंबरीवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. 65 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भुषविलेले आहे.
डॉ. सदानंद देशमुखांचे साहित्य देखील महाराष्ट्रातील जवळ-जवळ सर्वच विद्यापीठांमधून अभ्यासले जाते. त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पीएच डी., एम. फौल पदव्यांसाठी संशोधन पूर्ण केलेले आहे; काहींचे संशोधन सुरु आहे.
काव्य पुरस्कार :- बावषी ऐश्वर्य पाटेकर, आडगाव, नाशिक ह्यांना त्यांच्या कासरा ह्या काव्य संग्रहासाठी स्वातंत्र्य सैनिक प्राचार्य गो. पु. देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्याचे परीक्षण समितीने निश्चित केलेले आहे त्यांचे ज् (आत्मकथन), कासरा (काव्यसंग्रह), भूईशास्त्र (काव्यसंग्रह) आणि भाषेच्या बिया (आस्वादक समीक्षा) आदी ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.
त्यांच्या 'भूईशास्त्र' ह्या काव्यसंग्रहास आजपर्यंत साहित्य अकादमी पुरस्कार 2011, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार इंदिरा संत काव्य पुरस्कार, गदिमा काव्य पुरस्कार, शब्दगंध साहित्य पुरस्कार, अंकूर साहित्य पुरस्कार यासारखे एकूण 12 पुरस्कार आणि पटकथालेखनाच्या झी टॉकीज पुरस्कृत 2011 चा पुरस्कार 'अनटोल्ड स्टोरी ऑफ नवनाथ पानसरे' या पटकथेस प्राप्त ओडीया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी भाषामध्ये 'भूईशास्व' काव्यसंग्रहातील कवितांचा अनुवाद झालेला आहे.
त्यांच्या कथालेखनाला सुध्दा यशवंतराव चव्हाण साहित्य लेखन स्पर्धा (2008); दे. गावकरी राज्यस्तरीय साहित्य लेखन स्पर्धा (2009); सकाळ दिवाळी अंक कथालेखन स्पर्धा 2009 हे प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.त्यांचे साहित्य पुणे विद्यापीठ; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, संत गाडगे बाबा अमरावती, देवो अहिल्या विश्वविद्यालय, इंदौर येथे बी.ए. आणि एम.ए. च्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे संशोधन कार्य देखील त्यांच्या साहित्यावर झालेले आहे.
कादंबरी पुरस्कारःकादंबरीकरीता प्रा. डॉ. भीमराव शिवाजी वाघचौरे वैजापूर जि. संभाजीनगर यांच्या जखडण कादंबरी सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे स्मृती पुरस्कार डॉ. भीमराव वाघचौरे यांचे आजवर रानखळणी, पाणधळी, गराडा, अंगारकूस, नवं काटवन, पिंडोवरचे विचू, किजाळकाटे, जखडण, धरंगळण ह्या कादंब-या, मरणावळ, मूळमाती हे कथासंग्रह; आणि रा. र. बोराडे यांचे साहित्य हा समीक्षा ग्रंच प्रकाशित आहे.डॉ. भीमराव वाघचीरे यांच्या साहित्याला आजवर नरहर कुरुंदकर पुरस्कार, ग.ल. ठोकळ पुरस्कार, तुका म्हणे पुरस्कार, उध्दव शेळके राज्यपुरस्कार, ह. ना. आपटे राज्य पुरस्कार तसेच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे या विद्यापीठांमधून डॉ वाघचौरेंचे साहित्य अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट आहे.साहित्य संमेलन, कथाकथन, स्नेहसंमेलन या सर्व कार्यक्रमामध्ये आजवर ते अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झालेले आहेत.
संकीर्ण विभाग पुरस्कार :संकीर्ण विभागामधून श्री सुरेश हरिभाऊ पाचकवडे, अकोला यांची त्यांच्या देहाबरं ह्या कथासंग्रहाची श्रीमती शालीनीताई देशमुख स्मृती पुरस्कार जाहिर झाला आहे. त्यांचे सावली, ग्रीष्मपर्व कधीतरी हे काव्यसंग्रहः वाटा मुकेपणाच्या, गोंदणवेणा, देहाक्षरं हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांना आजवर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार; गदिमा प्रतिष्ठान पुणेचा मृत्युंजय पुरस्कार, अक्षरवेदी पुरस्कार यादी मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत.4 थे शुभम बाल साहित्य संमेलन, 37 वे अंकूर साहित्य संमेलन, 4 थे सृजन साहित्य संमेलन, 1 ले कलाविष्कार साहित्य संमेलन यामध्ये अध्यक्षपदाचा सन्मान झालेला आहे. अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली
إرسال تعليق