आदर्श ज्ञानपीठ मध्ये सायन्स एक्सहिबिशन उत्साहात संपन्न

 स्थानिक घाटपुरी नाका येथील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. विज्ञान प्रदर्शनी साठी पालकांचा व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन  सौ रजनीदेवी मोहता, श्री गजानन सावकार तसेच सौ सावकार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपली विज्ञान प्रदर्शनीत आणलेले प्रोजेक्ट पालकांना व मान्यवरांना व्यवस्थित रित्या समजून सांगितले तसेच आपल्या स्पीचद्वारे विज्ञानाचे आजच्या युगात असणारे महत्त्व पटवून दिले.यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेले पोस्टर्स तसेच विविध प्रोजेक्ट मॉडेल द्वारे  सोलर सिस्टिम, वॉटर पुरिफिकेशन, एअर प्रेशर, ग्लोबल वॉर्निंग, इसरो चांद्रयान प्लॅन्ट सीड जरमिनेशन सायकल, व्होलकॅनो, पाण्याचे गुणधर्म आणि उपयोग, हुमन सेन्स ऑर्गन्स इत्यादी ची माहिती पदर्शनी पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना तसेच पालकांना करुन दिली.

 मान्यवरांनी आपल्या स्पीच द्वारे  विज्ञान दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रोजेक्ट बनवल्याबद्दल  अभिनंदन केले.कार्यक्रमाची सांगता मान्यवरांकडून तसेच पालकांकडून  अभिप्राय घेऊन करण्यात आली. पालकांनी दिलेल्या छान अभिप्रायामुळे प्रदर्शनीत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह गगनात मावेनाचा झाला होता आणि त्यामुळे भविष्यात अधिक चांगले प्रोजेक्ट बनविण्यासाठी प्रेरणा मिळाली.

 विज्ञान प्रदर्शनी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांची तसेच पालकांची  उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या अनिता पळसकर, जेष्ठ शिक्षिका ममता महाजन, प्रियंका राजपूत, ज्योती वैराळे, माधुरी उगले, अश्विनी देशमुख, कल्पना कस्तुरे, अलका वेरूळकर, दामिनी चोपडे, प्रिया देशमुख, सारिका सरदेशमुख, निशा खंबाईतकर, संगीता इंगळे, प्रियंका वाडेकर, विजया पोकळे , अश्विनी वक्ते, कोमल आकणकर, सपना हजारे,वंदना गावंडे, संगीता पिवळटकर, सुवर्णा वळोदे, राजकन्या वडोदे, प्रतिभा गावंडे, भाग्यश्री सपकाळ आदींनी प्रयत्न केले.

Post a Comment

أحدث أقدم