वन्य प्राण्यांचा धुमाकूळ: हरभरा,ज्वारी पिकांचे नुकसान
जयरामगड:- खामगाव वन विभाग कार्यालय अंतर्गत शिरला नेमाने बीट परिसरातील जयरामगड हद्दी मधे गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांचा रात्रीच्या वेळी धुमाकूळ सुरू आहे. निल गाय(रोही), रानडुक्कर,हरीण, इत्यादी वन्य प्रान्यांमुळे हरभरा, ज्वारी आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
याकडे खामगाव वन विभाग दुर्लक्ष करीत आहे. पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जागरण करत असतो. आधीच शेतकरी अस्मानी संकटांमुळे हवालदिल झाला आहे. आणि त्यातच वन्य प्राण्यांच्या धुमाकूळ मुळे शेतकरी वैतागले आहे. त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जयराम गड परिसरातील शेतकऱ्यांकडून कऱण्यात येत आहे.
إرسال تعليق