एसटी कामगार सेनेचे आज नागपूर येथे धरणे
(नागपूर जनोपचार) महाराष्ट्राच्या प्रगती मध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांबाबत महाराष्ट्र सरकार कडून अपेक्षित असलेले कोणतेही निर्णय होत असताना दिसून येत नाहीत.त्यामुळे एसटी कर्मचान्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे.दरम्यान विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या वतीने नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खा. अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या अध्क्षतेखाली महाराष्ट्र एस. टी.कामगार सेनेचे बुलढाणा विभागाचे शिलेदार राज्य उपाधयक्ष गजानन माने,प्रादेशिक सहाचिव विजय पवार, विभागीय सचिव संजय उबरहंडे,विभागीय अध्यक्ष संदिप पाचपोर यांच्या नेतृतवाखाली नागपूर येथील धरणे आंदोलन होणार आहे
إرسال تعليق