खामगांवकरांच्या आरोग्याशी चालवला खेळ?

शहरातुन कचारा गोळा करणाऱ्या ५३ घंटागाड्यातुन १३ घंटागाड्या कमी केल्याने खामगावकर संतप्त



खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्कल:-खामगाव शहराचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी न.प.चा पदभार स्वीकारल्यानंतर शहरातून कचरा उचलण्याचे टेंडर काढले परंतु हे काढलेले टेंडर बेकायदेशीर असल्याचा आरोप होत आहे. मागील अनेक वर्षापासून न.प.मध्ये घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे टेंडर निघाले असून त्यामध्ये नेहमीच ५३ घंटागाड्याचा समावेश होत होता. परंतु खामगाव न.प. मुख्याधिकारी शेळके यांनी  फक्त ४० घंटागाड्यांचा समावेश असलेले टेंडर काढून तेरा घंटागाड्यावरील एकुण सव्वीस कामगारांना बेरोजगार(?) केले .व त्यांचा परिवार उघड्यावर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे . 

अन्‍यथा आंदोलन...
खामगाव शहरात दररोज प्रत्येक घरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम तसेच शहरात ज्या ज्या भागात कचरा टाकला जातो त्या ठिकाणाहून दररोज कचरा उचलण्याचे काम संबंधित ठेकेदाराचे आहे. तसे होत नसल्यास संबंधित ठेकेदारावर नगरपालिकेने त्वरित दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा खामगाव शहरात ज्या ठिकाणी कचरा साचलेला दिसेल त्याच ठिकाणी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांचे फोटो लावुन मनसे अनोखे आंदोलन छेडणार आहे. याची खामगाव नगरपालिका मुख्याधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी नोंद घ्यावी.
 - आनंद गायगोळ, मनसे शहर अध्यक्ष

      सध्या स्थितीत शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम ४० घंटागाड्या कार्यान्वित आहेत.परंतु या घरोघरी जाऊन कचरा उचलणे आत्ता पुर्वी सारखे शक्य होणार नाही अशी ओरड आहे. कारण यामध्ये १३ गाड्यांची कमतरता असल्याने पुर्णपणे कचारा उचलणे शक्य होणार नाही. यामुळे शहरात रोगराई पसरून खामगावकरांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येऊ शकते.

न.प.ने बेकायदेशीररित्या काढलेल्या टेंडर विरोधात मनसे न्यायालयात जाणार ः विठ्ठल लोखंडकार
खामगाव शहरात मागील पाच वर्षापासून ५३ घंटा गाड्याद्वारे घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू आहे. वास्तविक पाहता या ५३ घंटागाड्या शहराचा कचरा गोळा करण्यास अपुऱ्या पडतात. तसेच प्रत्येक वर्षी शहराची लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार कचरा गोळा करण्याकरीता घंटागाड्या सुद्धा खामगाव नगरपालिकेने वाढवणे गरजेचे होते. परंतु नगरपालिकेने तसे केले नाहीच. उलट ५३ घंट्या गाड्यातुन १३ घंटा गाड्या कमी केल्या आत्ता शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता ४० घंटा गाड्यावर जोर पडणार असून शहरातील कचरा उचलणे शक्य होणार नाही. त्यामुळे शहरात कचरा साचून राहणार आहे. त्यामुळे शहरात रोगराई पसरुन डेंगू, मलेरिया सारखे रोग उद्भवतील. त्यामुळे शहरातील जनतेचे आरोग्य धोक्यात येणार आहे तरी न.प. मुख्याधिकारी यांनी त्वरित सुधारित टेंडर काढून पूर्वीसारख्या ५३ घंटा गाड्याचे किंवा त्यापेक्षा अधिक गाड्याचे समावेश असलेले टेंडर काढावे अन्यथा मनसे आंदोलन छेडणार आहेच. तसेच वेळप्रसंगी मुख्याधिकारी यांनी काढलेल्या बेकायदेशीर टेंडर विरोधात न्यायालयात सुध्दा दाद मागणार.
- विठ्ठल लोखंडकार, मनसे प्रदेश उपाध्यक्ष





Post a Comment

أحدث أقدم