इंग्रजी शाळांच्या हक्कासाठी व सन्मानासाठी नागपूर  हिवाळी  अधिवेशनावर भव्य धरणे आंदोलन


 खामगाव - महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन इंग्रजी शाळा संस्था चालक व शिक्षकांचे राज्यव्यापी धरणे आंदोलन आज पार पडले. आंदोलनातून राज्यभरातून मोठ्या संख्येने संस्थाचालक उपस्थित होते त्यामध्ये प्रमुख उपस्थिती डॉ. संजय तायडे पाटील संस्था अध्यक्ष मेष्टा डॉ. नामदेवराव दळवी प्रदेशाध्यक्ष सुदर्शना ताई महिला प्रदेशाध्यक्ष अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर  यांच्या उपस्थितीत आपल्या मागण्या व न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .


महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक आयोजित केलेल्या मोर्च्यामध्ये इंग्रजी शाळांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्या साठी गेल्या अनेक वर्षांपासून संघटना सरकार सोबत भांडत आहे तरी सुद्धा सरकार रास्त असलेल्या मागण्या पूर्ण करीत नाही आणि गेल्या पाच वर्षापासून बाकी असलेले 25% RTE प्रतिपूर्ती, टी,सी,नसताना देण्यात येणारे प्रवेश ,अनावश्यक ऑनलाईन कामे या मधून इंग्रजी शाळाना वगळण्यात यावे अशा अनेक मागण्यासाठी म्हणून हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आपल्या सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह सर्वांनी उपस्थित राहून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या  बुलढाणा जिल्हा मेष्ट कडून  जिल्हा अध्यक्ष श्रीकांत चोपडे तसेच अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर , खामगाव तालुका अध्यक्ष सागर उकर्डे व श्री.विश्वरसिंह राजपूत उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم