आत्मविश्वास व एकाग्रता ध्येयापर्यंत पोहोचविते  -  शांतीकुमार पाटील 

शांतीकुमार पाटील यांनी विद्यालयास स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली भेट 


       खामगाव जनोपचार :-  स्थानिक श्री. जी. वी. मेहता नवयुग विद्यालयात दि. २३-०८-२०२३ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला . त्याकरीता खामगांव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील यांचे मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले . त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे , प्राचार्य सुनील जोशी पर्यवेक्षक रामेश्वर वाकोडे उपस्थित होते . यावेळी शांतीकुमार पाटील यांनी विद्याथी दशेत असतांना कुठल्याही शिकवणी शिवाय आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो. मी एका ग्रामीण भागातील असून माझा आत्मविश्वास एकाग्रता ध्येय साधण्याची सचोटी माझ्यासोबत असल्यामुळे मी हे साध्य करू शकलो. असे उद्गार काढले आपण विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध कठोर परिश्रम घेऊन अभ्यास केला तर आपण निश्चितच स्पर्धा परीक्षेतून आपले ध्येय साध्य करू शकतो. असे आवाहन शांतीकुमार पाटील यांनी केले. 

विद्यालयातील स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उद्घाटन सुद्धा शांतीकुमार पाटील यांचे हस्ते करण्यात आले . त्याच अनुशंघाने शांतीकुमार पाटील यांनी जवळपास ७००० रुपयांचे विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके विद्यालयास भेट दिली . जेणेकरून विद्यालयातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेच्या माध्यमातून आपलं भविष्य उज्वल करावे असे आवाहन शांतीकुमार पाटील यांनी केले .

  याप्रसंगी बाळासाहेब काळे यांनी शां


तीकुमार पाटील यांनी देलेली मौल्यवान पुस्तके विद्यालयास भेट दिल्या  बद्दल त्यांचे आभार व कौतुक केले. 

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील जोशी , संचालन स्मिता अंध्याल , आभार प्रदर्शन प्रमोद नैताम यांनी केले सदर कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते .

Post a Comment

أحدث أقدم