अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपीस तीन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
न्या. सरोज मने - गाडेकर यांचा निर्वाळा
हिंगोली _ एका अल्पवयीन मुलीस जुलै २०२१ मध्ये पळवून नेऊन तीच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणीतील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. एन. माने गाडेकर यांनी तीन वर्ष सक्त - मजुरीची शिक्षा व २१ हजार रुपये दंड सुनावली.
याबाबत दिलेली माहिती अशी हिंगोलीतील खडकपुरा की, भागातील हर्ष उर्फ अंबादास आठवले ह.मु. देवडा नगर हिंगोली याने १४ जुलै २०२१ रोजी एका अल्पवयीन मुलीस पैशाचे व कपड्याचे आमिष दाखवून तीला पळवून नेले होते. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून रामाकृष्णा हॉटेल समोरील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत तीला नेऊन चापटाने मारहाण करून तीच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलिसात पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून हर्ष उर्फ यश आठवले याच्या विरूद्ध बाल लैंगीक अत्याचार अधिनियम २०१२ यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख यांनी केला. न्यायाधिश एस. एन. माने - गाडेकर यांच्या समोर चालले. ज्यामध्ये सहाय्यक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी १३ साक्षीदार तपासले.
![]() |
जाहिरात |
ज्यामध्ये प्रकरणातील पिडीता व तपासीक अंमलदाराची साक्ष महत्वाची ठरली. ३० सप्टेंबर रोजी अंतीम सुनावणीत हर्ष उर्फ यश (प्रतिनिधी) अंबादास आठवले याला कलम ३६३व ५०६ अन्वये दोषी ठरवून हजाराचा दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम ३२३ मध्ये सहा महिने सश्रम कारावास व एक हजाराचा दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस कारावास तसेच कलम ८ व १२ बाल लैंगीक अत्याचार कायद्यान्वये प्रत्येकी तीन वर्ष सक्त कारावास व पाच हजार रुपयाचा दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली.
إرسال تعليق