खामगाव येथील गुरुवार व शुक्रवारचा आठवडी बाजार रद्द


बुलडाणा, दि. 23 : गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने खामगाव शहरामध्ये गुरुवार, दि. 28 सप्टेंबर आणि शुक्रवार, दि. 29 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खामगाव येथील आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.

खामगाव येथे गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार  आहे. मिरवणूकीमध्ये 15 ते 20 हजार लोकांचा सहभाग असतो. तसेच याच दिवशी ईद-ए-मिलाद सण असल्याने उत्सव साजरा करण्यात येतो. खामगाव शहर संवेदनशील असून याच दिवशी खामगाव शहरामध्ये आठवडी बाजार भरविण्यात येतो. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, याकरीता खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 आणि दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जन होत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही, यासाठी खामगाव शहरामध्ये दि. 28 सप्टेंबर 2023 आणि दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहे.

000000

Post a Comment

أحدث أقدم