...अखेर महिलांच्या आंदोलनाची  तत्काळ दखल 

अवैध दारू साठा जप्त हिवरखेड पोलिसांची कारवाई 


खामगाव (लक्ष्मण कान्हेरकर) तालुक्यातील हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध दारु विक्रीसाठी उमरा अटाळी येथील महिलांनी 27/09/ 2023 ला जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर ऊपोषणाचा ईशारा देतात हिवरखेड पोलीस स्टेशन मोडवर आले. दरम्यान 24 सप्टेंबर रोजी छापा टाकण्यात आला. याप्रकरणी हिवरखेड पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार कैलाश चौधरी यांनी तत्काळ दखल घेत अवैध दारु अड्ड्यावर कार्यवाही केली . हिवरखेड  पोलीस स्टेशन चे पो हे काॅ विठ्ठल चव्हाण ना पो काॅ प्रविण जाधव आणि आठ होमगार्ड यांच्या टिमला ठाणेदार चौधरी  यांचे मार्गदर्शन ाखाली  उमरा अटाळी गावातील अवैध हात भट्टी दारु विक्रेता दिपक विश्वनाथ गव्हाचे वय 40 वर्ष यांचेवर धाड टाकून त्याचे कडुन 12 डब्बे मोह गुळ सडवा  हात भट्टी दारु व देशी दारू सह  एकुण 11000 रु चा माल जप्त केला. त्याचेवर अ प नं 175/23 कलम 65 ड, फ नुसार कार्यवाही केली. पुढील तपास बीट अंमलदार पो हे काॅ विठ्ठल चव्हाण व ना पो काॅ प्रविण जाधव करीत आहेत.

Post a Comment

أحدث أقدم