स्व. डॉ. बाबासाहेब कविश्वर" यांचे १०० व्या जयंती निमित्त होमिओपॅथी शास्त्राचे विविध कार्यक्रम संपन्न


Khamgaon:-  पंचशील होमिओपॅथीक शिक्षण प्रसारक मंडळ खामगांव चे संस्थापक "स्व. डॉ. बाबासाहेब कविश्वर" यांचे १०० व्या जयंती निमित्त महाविद्यालयाचे सभागृहामध्ये होमिओपॅथी शास्त्राचे विविध विषयावर सेमीनार आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सुरुवातीला संस्थेच अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कविश्वर प्रमुख मान्यवर सुप्रसिध्द होमिओपॅथी तज्ञ डॉ. किशोर मेहता (मुंबई), डॉ. अरविंद कोठे (नागपुर), डॉ. जय पटेल (मुंबई), तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्वर आणि महाविद्यालयाचे जेष्ठ प्रा. डॉ. सुधीर एडस्कर, संस्थेच्या सचिव डॉ. सौ. मंगला कविश्वर, प्रा. डॉ. दिलीप चौधरी, प्रा. डॉ. यशवंत वानखडे तसेच महाविद्यालयाचे शिक्षक आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थीतीत स्व. डॉ. बाबासाहेब कविश्वर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजिंक्य कविश्वर यांनी डॉ. बाबासाहेब कविश्वर यांचे वैद्यकीय व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला आणि पंचशील होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढील उपक्रमाबद्दल माहिती सांगीतली.

यानंतर महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक प्रा. डॉ. सुधीर एडकरकर, प्रा. डॉ. सौ. मंगला कविश्वर प्रा. डॉ. दिलीप चौधरी, प्रा. डॉ. वानखडे यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर सुप्रसिध्द होमिओपॅथी तज्ञ डॉ. किशोर मेहता (मुंबई), डॉ. अरविंद कोठे (नागपुर), डॉ. जय पटेल (मुंबई) यांनी सेमीनारसाठी उपस्थीत शिक्षक आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना होमिओपॅथी शास्त्रासंबंधी मागदर्शन केले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दादासाहेब कविश्वर यांनी सुध्दा उपस्थीत विद्यार्थ्यांना होमिओपॅथी शास्त्र हे कशे गौरगरीब जनेसाठी उपयुक्त असून या शास्त्राची प्रॅक्टीस शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी करून समाजीची सेवा करावी. तसेच

स्व. डॉ. बाबासाहेब कविश्वर यांनी हे महाविद्यालयाचे लावलेले रोपटे आज एक वटवृक्ष झाले आहे. आणि महाविद्यालया

मार्फेत झालेले डॉक्टर आज समाजामध्ये आपली वैद्यकीय सेवा देत आहेत असे प्रतिपादन केले.

महाविद्यालयाचे व्दितीय वर्ष बि.एच.एम.एस चे विद्यार्थ्यांनी आज समाजामध्ये इतर आजारामध्ये "माणसिक ताण तणाव " हा आजार कशा प्रकारे मोठया प्रमाणमध्ये पसरत असून त्याची लक्षणे काय आहेत. तसेच माणिसिक ताण तणाव आजार कशाप्रकारे दुर केल्या जावू शकतो आणि यामध्ये होमिओपॅथी शास्त्राचा उपचार करून या आजारावर कशाप्रकारे मात करता येवू शकते. तसेच महीला सबलीकरणावर या विषयावर देखील महाविद्यालयाचे परीसरामध्ये विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर केले.

तसेच प्रथम वर्ष बि. एच. एम. एस चे विद्यार्थ्यांनी होमिओपॅथीक फार्मसी या विषयाचे अनुषंगाने प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीचे मान्यवरांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीमध्ये प्रदर्शीत केलेल्या फार्मसी मॉडेलचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहीत केले आणि विभागप्रमुख डॉ. स्वाती तराळे आणि डॉ. दुर्गा दाभाडे यांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. सौ. गायत्री सोनी अणि डॉ. सौ. जयश्री ढोकणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रभुदास मुखीया यांनी केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थीत होते.

Post a Comment

أحدث أقدم