लक्कडगंज येथील युवकांनी घेतला वंचित बहुजन आघाडीत प्रवेश
खामगाव-येथील लक्कडगंज भागातील युवकांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला
लक्कडगंज येथे पक्ष प्रवेश चा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती शरदभाऊ वसतकार (पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष)गणेश भाऊ चौकसे जिल्हाध्यक्ष, अनिल वाकोडे जिल्हाध्यक्ष युवक आघाडी,संघपाल जाधव उप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांची होती तर विशेष उपस्थिती रमेश गवारगुरू,रिंकू पोपली,मोनू सलूजा, इंगळे सर,अशोक वानखेडे यांची होती
सुरवातीला महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचे भाषणे झाली त्यात जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या आचारसंहिता संदर्भात माहिती देत लक्कडगंज येथील नगरसेवक हा वंचित बहुजन आघाडीचा होईल असा विश्वास व्यक्त केला असून वंचितच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ शकते असा उद्धार काढले अमित फुलारे यांच्या सह अनेक युवकांनीं वंचित मध्ये पक्ष प्रवेश केला त्यावेळी युसूफ भाई,इम्रान भाई, प्रकाश वानखेडे,आश्विन खंडारे,भास्कर वानखेडे, गौतम वाघमारे,अनिल तायडे,संजय खंडाळकर,अमर तायडे,करण वानखेडे, करण वाघमारे,लुकमान भाई,अदनान भाई,फिरोज सर,दीपक महाजन,रुपेश अवचार,गोपाळ वानखेडे,नामदेव भाऊ,आनंद तोंडे,भारत भाऊ,धनराज वानखेडे, गगन वानखेडे,करणं छापरवाल,सुमित छापरवाल,सह लक्कडगंज परिसरात महिला पुरुष ही मोठ्या संख्येत उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शन अमित फुलारे यांनी केले असून वंचितांच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही फुलारे यांनी दिली
إرسال تعليق