श्री कालिंका देवी कासार समाज मंडळ खामगांव तर्फे पूरग्रस्तांना साड्या व कपड्यांची मदत
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- मागील चार-पाच दिवसांपूर्वी संपूर्ण विदर्भात अतिवृष्टी झाली त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, सोनाळा जळगाव जामोद व शेगाव तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे. अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत. या आपदाग्रस्तांना मदत करण्यासाठी खामगाव सोमवंशीय क्षत्रिय कासार समाजाने पुढाकार घेतला आहे.
आज दिनांक 25 जुलै 2023 रोजी श्री कालिंका देवी मंदिर वामन नगर खामगाव येथे कासार समाजातर्फे सव्वाशे साड्या व इतर कपडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मार्फत आपदाग्रस्तांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, प्रल्हाद निमकंडे नगर संघ चालक, ओम संगवई भारत विकास परिषद, व वैभव निळे जिल्हा सामाजिक समरसता हे उपस्थित होते.
पूरग्रस्त भागात खूप बिकट अवस्था असून याबाबत सर्व समाजाने एकमताने मदतीसाठी पुढाकार घेण्याचे ठरवले. या महापुरात सर्व काही वाहून गेलं आहे. शेकडो कुटुंब उध्वस्त झाले आहे. अत्यंत भयावह परिस्थिती असून या पूरग्रस्तांना मानवतेचा दृष्टीकोन ठेवून खामगांव येथील कासार समाजाने पुढाकार घेत फुल न फुलाची पाकळी मदत दिली आहे.*
यावेळी श्री कालिंका देवी कासार समाज मंडळाचे अध्यक्ष वासुदेव आमले, अनिल रंगभाल उपाध्यक्ष, सचिव जितेंद्र कुयरे,सह सचिव देवेंद्र दगडे, विजय बारस्कर कोषाध्यक्ष, कासार समाज बुलढाणा जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ हेमा अनिल आमले, सौ अनिता अनिल धोपटे, श्रीमती जयश्री कोमटे, सौ नंदिनी सुनील आमले, सौ लता वासुदेव आमले, सौ गिता सुनील माहुरकर, सौ अंजू संजय मैंद, सौ जयश्री प्रफुल पांढरकर, सौ संगीता दगडे, सौ योगिता संदीप वैद्य, तसेच श्री विनायकसेठ तांबट, सुनील माहुरकर, श्री नितीनसेठ धोपटे, श्री प्रदीप माहुरकर, श्री संजय मैंद, श्री संदीप वैद्य, अक्षय माहुरकर, गोपाल माहूरकर, प्रफुल पांढरकर, विशाल पांढरकर, संजय रमेश धोपटे , किरण मुळे, अनिल सातपुते, संस्कृती कुयरे याची उपस्थिती होती
إرسال تعليق