मेस्टा च्या वतीने गटसाधन केंद्र खामगांव इथे सदिच्छा भेट
खामगांव - महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन च्या वतीने गटसाधन केंद्र खामगाव येथे नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी गायकवाड साहेब यांना मेष्टाच्या वतीने सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संदर्भात इंग्रजी शाळांनी घ्यावयाची दक्षता. तसेच आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या 25% प्रतिकृती बाबद चर्चा करण्यात आली . यावेळी मेष्टाचे अमरावती विभागीय उपाध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सर मेस्टl जिल्हा अध्यक्ष श्री श्रीकांत चोपडे व मेस्टl खामगाव तालुकाध्यक्ष सागर उकर्डे उपस्थित होते.
إرسال تعليق