खरडून गेलेल्या शेतजमिनीना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे तहसीलदार यांना निवेदन.
हिंगणे गव्हाड ता. नांदुरा :- चांदूर बिस्वा महसूल मंडळ दि. तर18 जुलै व 19 जुलै अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी हया छोट्या मोठ्या पिकासह संपूर्णपणे खरडून गेली आहेत तेव्हा अशा शेतकऱ्यां शेतात जावुन त्वरित सर्वे करून यांना 1 लाख रुपये अनुदान देण्याकरिता चांदूर बिस्वा येथील अंबिका फाउंडेशनचे अध्यक्ष अभय संतोषराव पाटील यांनी तहसीलदार नांदुरा यांना दि. 24 जुलै रोजी या संदर्भात निवेदन दिले आहे
सदर निवेदनात नमूद केले आहे चांदुर बिस्वा महसूल मंडळामध्ये 18 जुलै ते 19 जुलै पर्यंत अतिदृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी हया पिकासह संपूर्णपणे खरडून गेल्या आहे त्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाले असून आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे महसूल विभागाने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जावुन त्वरित सर्वे करून हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावे असे म्हटले आहे
إرسال تعليق