विज कर्मचा-यावर हल्ला व शासकिय कामात 


अडथळा प्रकरणी ६ महीने सक्त मजुरी

खामगाव  : विज बील न भरल्याने वसुली करीता वविदयुतपुरवठा खंडीत करण्याकरीता कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला मारहाण करूनशासकिय कामात अडथळा करणा-या आरोपीला ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षासुनावण्यात आली. हा निकाल खामगाव येथील २ रे तदर्थ जिल्हा व अतिरिक्त सत्रन्यायाधिश श्री पी. पी. कुळकर्णी यांनी जाहीर केला.याबाबतची हकीकत अशी की, दि. २६/०३/२०१८ रोजी विज कर्मचारी जुनैद शहात्यांचे सहकारी कर्मचा-यांसोबत वरखेड बु येथे थकीत विज बील वसुली करीता गेलेहोते. तेथील ग्राहक कालुखान सत्तारखान, याचेकडे विज देयक थकीत असल्यानेत्याला रकमेची मागणी करण्यात आली. त्याने थकीत रक्कम भरण्यास नकार दिल्यानेविज कर्मचारी त्याचा विज पुरवठा खंडीत करण्याकरीता इलेक्ट्रीक पोलवर चढतअसतांना आरोपीने त्याची कॉलर धरून लोटपाट केली. त्याचे हातातील कागदपत्रांचीफेकफाक केली अशी तक्रार फिर्यादीने खामगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती.

उपरोक्त फिर्यादीवरून गुन्हा क्र. २४७/२०१८ दाखल करून स. पो. नि. रामराव

चतुरसिंग राठोड यांनी तपास करून दोषारोप पत्र सादर केले. सदर प्रकरणात सरकार

तर्फे ४ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पुराव्यावरून व कागदपत्रांवरून आरोपीचा

गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस ६ महीने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Post a Comment

أحدث أقدم