सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत वैद्यकीय रोग निदान शिबिर
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- संघमित्रा महिला युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ खामगाव च्या वतीने आद्य शिक्षिका माता सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत वैद्यकीय रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रोग निदान शिबिरा करिता डॉक्टर अतुल बडे तसेच परिचारिका संध्या साबळे यांनी रुग्णांचे वैद्यकीय तपासणी करून योग्य मार्गदर्शन करून उपचार केले शिबिरामध्ये 50 ते 60 रुग्णांनी सदर योजनेचा लाभ घेतला तसेच दिनांक 12/03/ 2023 रोजी मंडळाच्या वतीने माता सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त जे.व्ही मेहता हायस्कूल समोर मंडळाचे जागेवर खिरदान वाटपाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला आहे मंडळाचे अध्यक्ष सौ सीमा संजय पहुरकर सचिव सौ.प्रतिभा प्रमोद पायस सहसचिव सौ. सुनिता कोकणे तसेच मंडळाचे सदस्य श्रीमती जंजाळ भगिनी श्रीमती कांचन गंधार श्रीमती उज्वला आराख विशेष सहयोग कुमारी विधीशाज्ञी संजय पहुरकर व सर्वज्ञा प्रमोद पायस यांनी केले
إرسال تعليق