*अग्रवाल हॉस्पिटलचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी स्थानांतरण व उद्घाटन सोहळा* 



खामगाव: स्थानिक डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांनी नाशिक,मुंबई, ऑस्ट्रेलिया येथे सेवा दिल्यानंतर मोठ्या शहरात न राहता, आपली जन्मभूमी खामगाव येथेच रुग्णसेवा व्हावी या उदात्त हेतूने आणि बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांना मोठा खर्च आणि त्रास सहन करून मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने ते खामगाव आणि आयकॉन हॉस्पिटल अकोला येथे मागील 3 वर्षांपासून सेवा देत आहेत. मागील 3 वर्षात गरजू रुग्णांसाठी बुलढाणा व अकोला जिल्ह्यात 44 अस्थिरोग तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप केले आहे. तसेच गुडघाबदली व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून नावलौकिक प्राप्त केला आहे. 

जाहिरात 👆
अशा जाहिरातींसाठी संपर्क साधा 820 881 94 38

तसेच डॉ. नितीश यांची सुविज्ञ पत्नी डॉ. सौ. शारदा या स्त्रीरोग विशेषज्ञ असून त्यांनी पुणे, मुंबई, हैदराबाद येथे सेवा दिल्यानंतर; त्या सामान्य रुग्णालय खामगाव येथे यशस्वीरीत्या सेवा देत आहेत. आता दोघांचे यशस्वी रुग्णसेवेचे 3 वर्ष पूर्ण होऊन हॉस्पिटलचे अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून निर्मित नवीन वास्तूमध्ये नवीनतम अद्यावत सुविधांसह स्थानांतरण होत आहे.

हा उद्घाटन सोहळा रविवार दि. 26 फेब्रुवारी ला  प. पू. श्री. शंकरजी महाराज (जागृती आश्रम) यांच्या शुभहस्ते आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यास आमच्या हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

أحدث أقدم