खामगाव चे नवीन डॅशिंग ठाणेदार शांतीकुमार पाटील

 कबीरा खडा बाजार मांगे सबकी खैर .....ना काहु से दोस्ती ना कहु से बैर्!

ठाणेदार शांतीकुमार पाटील

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्रिभुवन यांची बदली झाली असून त्यांच्या जागी डॅशिंग ठाणेदार शांतीकुमार पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे .शांतीकुमार पाटील यांनी यापूर्वी जिल्हा वाहतूक शाखेत निरीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी केली.  "कबीरा खडा बाजार मांगे सबकी खैर., ना काहुसे दोस्ती ना काहु से वैर " अशी शांतीकुमार पाटील यांची वृत्ती असल्याने नक्कीच अवैध व्यवसायाला आळा बसणार आहे .वाहतूक शाखेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात हजारो कारवाया केल्या आहेत . त्यामुळे खामगाव शहरातील वाहतूक सुरळीत होऊन रस्ते मोकळे होणार असल्याचे बोलले जाते. शांतीकुमार पाटील यांनी यापूर्वी अमरावती जिल्ह्यातील वरुड ,गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी, उल्हासनगर, भिवंडी अशा सेंसिटिव्ह प्लेस वर आपली ड्युटी बजावली आहे हे विशेष







Post a Comment

أحدث أقدم