ॲड आकाश फुंडकर यांनी केले महामानवाच्या पुतळयाला अभिवादन
भारत रत्ऩ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार सर्वांनी अंगिकारावा – आ.ॲड.आकाश फुंडकर
खामगाव(जनोपचार)- भारत रत्ऩ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमीत्य़ आज खामगांव विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव येथील महामानवाच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पाहार अर्पण करुन अभिवादन केले.*
*यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधीत करतांना भारत रत्ऩ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता बंधुतेच्या विचार सर्वांनी अंगिकारावा असे आवाहन केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे संपुर्ण जीवन हे एक आदर्श म्हणून जगले. त्यांच्या या आदर्श जीवनाचा सर्वांनी अवलंब करावा असे ही आमदार ॲड आकाश फुंडकर यावेळी म्हणाले.*
*यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ,युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हा सरचिटणीस आशिष सुरेका, अ.जा.मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनिल वानखडे, अ.जा.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अशोक हटटेल, अ.जा.मोर्चा जिल्हा सचीव युवराज मोरे, अ.जा.मोर्चा तालुकाध्यक्ष राजेश तेलंग, अ.जा.मोर्चा शहराध्यक्ष रमेश इंगळे, प्रतिक मुंडे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठया संख्येत उपस्थित होते.*
إرسال تعليق